
तोंडाची दुर्गंधी टाळायची असेल तर स्वच्छ दात घासण्यासोबत जीभ स्वच्छ ठेवायला हवी. कारण जिभेवर दुर्गंधी साचल्यास तोंडाचा वास येऊ शकतो. दररोज सकाळी जीभ क्रॅपरने स्वच्छ करावी तसेच दिवसभर पुरेसे पाणी प्यावे.
अँटीसेप्टिक माऊथवॉश वापरल्याने जिभेवरील बॅक्टेरिया कमी होतात. कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून गुळण्या केल्याने जंतूंचा नाश होतो. श्वास ताजा राहतो. सफरचंद, गाजर यांसारखी कडक फळे व ताज्या भाज्या खाल्ल्याने जीभ नैसर्गिकरीत्या स्वच्छ होण्यास मदत होते.
































































