
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे – शहरप्रमुख – आशीष गावंडे (अकोला पश्चिम), उपजिल्हाप्रमुख – सुरेंद्र विसपुते (अकोला पश्चिम विधानसभा), शहर संघटक – राजू चव्हाण (अकोला पश्चिम), शहर युवा अधिकारी – प्रशांत मानकर (अकोला पश्चिम), जिल्हा संघटक (शेतकरी सेना) – शिवा मोहोड (अकोला पूर्व, अकोट विधानसभा), जिल्हा संघटक – गंगाधर ढोरे (बाळापूर, आकोट, मूर्तिझापूर विधानसभा), भूषण भिरड (अकोला पूर्व, अकोला पश्चिम), जिल्हा समन्वयक – अश्विन पांडे (अकोला पूर्व, अकोला पश्चिम).





























































