
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला पुन्हा एकदा उड्डादरम्यान तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला आहे. जेद्दा कोझीको़डला जाणाऱ्या विमानात अचानत तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्याने वेळीच सतर्क होत आपत्कालीन माहिती देत विमानाचे लँडिंग केरळमध्ये केले.
विमानात यावेळी 160 प्रवासी प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने टेकऑफ केल्यानंतर लॅंण्डिंग गिअर मध्ये तांत्रिक बिघाड झाला. ज्यामध्ये टायर फेल झाले. पायलटने प्रसांगवधान राखत कोचीन विमानतळाला कळविले आणि आपत्कालीन लॅण्डिंगची परवानगी घेतली. विमानतळावर इमरजन्सी घोषित केली.आपत्कालीन परिस्थितीत सकाळी 9 वाजून 7 मिनीटांनी विमान सुरक्षितपणे केरळमध्ये उतरले. सर्व आपत्कालीन सेवा खुल्या केल्याने प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. लँडिंगनंतर विमानाची तपासणी केली असता दोन्ही उजव्या बाजूचे टायर फुटल्याची पुष्टी झाली असे सीआयएएलच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे.

























































