
मुंबई उच्च न्यायालयासह मुंबईतील सर्व न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या ईमेलवर मुंबई उच्च न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे.याबाबत पोलिसांना कळवल्यावर त्यांनी इमारत परिसर तत्काळ रिकामा करण्यास सांगितला. तसेच बॉम्बशोधक पथकाला तातडीने पाचरण करण्यात आले. ईमेलमध्ये फक्त उच्च न्यायालयच नव्हे तर सर्वच न्यायलये बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
सध्या पोलीस हा ईमेल कुठून आला, कोणी पाठवला याचा तपास करत आहेत. याबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही. या ईमेलमध्ये किला कोर्ट आणि वांद्रे कोर्टाचा उल्लेख आहे. सध्या पोलिसांनी न्यायालय परिसरात सुरक्षेत वाढ केली आहे.































































