टिकटॉकला अखेर अमेरिकेत खरेदीदार मिळाला

चायनीज कंपनी बाइटडान्सचा शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकला अमेरिकेत खरेदीदार मिळाला आहे. ऑरेकलच्या नेतृत्वातील एक इन्वेस्टर ग्रुप टिकटॉकला खरेदी करणार आहे. हा करार 22 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. टिकटॉकच्या विक्रीनंतर याचे जास्तीत जास्त शेअर अमेरिकन गुंतवणूकदारांकडे जातील. बाइटडान्सची भागीदारी केवळ 20 टक्के राहील. टिकटॉकचे सीईओ शू जी च्यू यांनी विक्रीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.