धुरंधर मधील ‘शरारत’ गाण्यासाठी पहिली पसंती होती तमन्ना भाटिया, मग माशी कुठे शिंकली? वाचा

आदित्य धरचा चित्रपट “धुरंधर” रिलीज झाल्यापासून दररोज बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. सध्या हा चित्रपट ताबडतोड कमाई करत असून, येत्या काही दिवसात हा चित्रपट ७०० कोटींपर्यंत पोहचणार आहे.

बॉक्स ऑफिसच्या पलीकडे सोशल मीडियावरही धुरंधर धुमाकूळ घालत आहे. अक्षय खन्नाच्या “FA9LA” या गाण्यापासून ते “शरारत” पर्यंत, प्रत्येक गाणे सध्या सर्वांच्याच तोंडी आहे. विजय गांगुली यांनी कोरिओग्राफ केलेले “शरारत” हे गाणे आयशा खान आणि क्रिस्टल डिसूझा यांच्या अदांनी प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. पण या गाण्यासाठी सर्वात आधी तमन्ना भाटियाची निवड करण्यात आली होती.

नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी अलिकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, आदित्य धर यांनी या गाण्यासाठी तमन्नाला कास्ट करण्यास मात्र नकार दिला. विजय म्हणाले की, “माझ्या मनात तीच होती. मी तिचे नाव सुचवले होते, पण आदित्य अगदी स्पष्ट होता की, त्याला मात्र तमन्ना भाटिया नको होती. यावर अधिक बोलताना विजय गांगुली म्हणाले की, आम्हाला फक्त एकाच व्यक्तीवर लक्ष केंद्रित करायचे नव्हते. तमन्ना असती तर कथेऐवजी तिच्यावर लक्ष केंद्रित केले असते.”

सध्या पडद्यावर धुरंधरने कुणालाही न जुमानता आपली घौडदौड कायम ठेवली आहे. ‘अवतार: फायर अँड अ‍ॅशेस’ सारख्या हॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही धुरंधरने मागे टाकले आहे.