तोंडातून दुर्गंधी येत असल्यास… हे करून पहा

आयुर्वेदानुसार, तोंडाची दुर्गंधी ही केवळ एक समस्या नाही, तर शरीरातील अंतर्गत असंतुलनाचे लक्षण मानली जाते. तोंडातून दुर्गंधी येत असल्यास लवंगाचे सेवन करा. लवंगमध्ये असलेले युजेनॉल कंपाउंड तोंडाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण असलेल्या बॅक्टेरियांचा खात्मा करण्यास मदत करते. दररोज 1-2 हलक्या भाजलेल्या लवंगा चावल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास आणि श्वास ताजेतवाने होण्यास मदत होते.

जेवणानंतर दररोज काही ताजी कोथिंबीरची पाने चावल्याने तुमचे तोंड स्वच्छ राहण्यास आणि श्वास ताजा राहण्यास मदत होते. तोंडाच्या दुर्गंधीवर बडीशेप हा एक प्रभावी उपाय मानला जातो.