
‘ज्ञानपीठ’ विजेते प्रख्यात हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे रायपूर येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 89 व्या वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘हताश से एक व्यक्ती बैठ गया था, अपने हिस्से में लोग आकाश देखते है’ अशा त्यांच्या अनेक कविता गाजल्या आहेत. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
1 जानेवारी 1937 रोजी राजनांदगाव येथे जन्मलेले विनोद कुमार शुक्ल गेल्या पाच दशकांहून अधिक काळ लिहीत होते. विनोद कुमार शुक्ल यांचा पहिला काव्यसंग्रह ‘अभिषेक जय हिंद’ 1971 मध्ये प्रकाशित झाला. त्यांचे कथासंग्रह ‘रूम ऑन अ ट्री’ आणि ‘कॉलेज’ हेदेखील खूप लोकप्रिय आहेत.
विनोद शुक्ल यांच्या ‘नौकर की कमीज’, ‘इफ इट ब्लूम्स वी विल सी’, ‘देअर युज्ड टू बी अ विंडो इन द वॉल’ या कादंबऱया हिंदीतील सर्वोत्तम कादंबऱयांपैकी एक आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणि कौल यांनी त्यांच्या ‘नौकर की कमीज’ या कादंबरीवर एक चित्रपटही बनवला होता. ‘देअर युज्ड टू बी अ विंडो इन द वॉल’ या कादंबरीसाठी त्यांना 1999 मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारही मिळाला आहे. अलीकडच्या काळात त्यांना ‘मातृभूमी बुक ऑफ द इयर’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच त्यांना पेन अमेरिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘नाबोकोव्ह’ पुरस्काराने सन्मानित केले. हा सन्मान मिळवणारे ते आशियातील पहिले साहित्यिक आहेत.
गाजलेले कवितासंग्रह
त्याचप्रमाणे ‘जय हिंद’ या संग्रहातील कविता, ‘तो माणूस नवीन उबदार कोट घालून निघून गेला, जणू काही विचार, सगळं घडायचंच राहील, काहीच अतिरिक्त नाही, कवितांमधील सर्वात लांब कविता, ‘आकाश पृथ्वीवर ठोठावतो’ या कवितांचेही जगभरात कौतुक झाले आहे. हताश से एक व्यक्ती बैठ गया था, अपने हिस्से में लोग आकाश देखते है, जो मेरे घर कभी नहीं आएंगे’, ‘प्रेम की जगह अनिश्चित है’, आँखें बंद कर लेने से… आदी त्यांच्या कविता खूप गाजल्या.


























































