
क्रूरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने वापरलेली अत्याधुनिक एमएच 60 आर अर्थात, ‘आयएनएएस 335 ऑस्प्रेज’ हेलिकॉप्टर्स हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत.
गोव्यातील ‘आयएनएस हंसा’ या हवाई तळावर नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत नुकताच हा सोहळा पार पडला. पाण्याच्या तोफांची सलामी देऊन या हेलिकॉप्टर्सचे स्वागत करण्यात आले. अत्याधुनिक सेन्सर्ससह सज्ज असलेली ही हेलिकॉप्टर्स पाणबुडीविरोधी व जमिनीवरील युद्धासाठी सक्षम आहेत. शोध आणि बचाव, वैद्यकीय मदत अशा विविध कामांसाठी याचा उपयोग येतो. या हेलिकॉप्टर्समुळे हिंदुस्थानी नौदलाच्या क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.


























































