गावकीला घाम फुटलाय, कारण…समाजमाध्यमांमध्ये शिवसेना-मनसे युतीचीच चर्चा

शिवसेना-मनसे युतीच्या ऐतिहासिक घोषणेच्या निमित्ताने अवघे वातावरण भारून गेले होते. समाजमाध्यमही यास अपवाद ठरले नाही. समाजमाध्यमात ठाकरेंच्या युतीचीच चर्चा होती. युतीची घोषणा होताच व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर मीम्सचा पूरचा आला. ठाकरे बंधूंना शुभेच्छा देतानाच नेटकऱयांनी विरोधकांची खिल्ली उडवली. ‘गावकीला घाम फुटलाय, कारण भावकी एकत्र आलीय,’ अशा प्रकारचे मेसेज सर्वत्र व्हायरल झाले.

ही तर ‘शिवयुती’

समाजमाध्यमात अनेक प्रकारचे फोटो, व्हिडीओ आणि संदेश फिरत होते. अनेकांनी ठाकरे बंधूंचे फोटो शेअर करीत ‘मराठी माणसाची वज्रमूठ’ अशी टॅगलाइन दिली. आता लढायचं मराठी माणसासाठी, मुंबईच्या भविष्यासाठी… आम्ही एकनिष्ठ, महाराष्ट्राशी, मराठीशी, ठाकरेंशी… असा निर्धारही नेटकऱयांनी व्यक्त केला. काही नेटकऱयांनी या युतीला ’शिवयुती’ची उपमा दिली.

काय म्हणाले नेटकरी…

 पक्ष आपला ठाकरे…
 मराठी माणूस ज्या गोष्टीची वाट पाहत होता तो क्षण आला…
 मुंबई आमची आहे आणि ती आमचीच राहणार…
 मुंबई कुणाच्या दयेवर नाही, तर ती मराठी माणसाच्या कष्टावर
उभी आहे…
 ही युती महाराष्ट्राला महाराष्ट्रद्रोह्यांपासून वाचवेल!
 आज पुन्हा मराठी माणूस ताठ मानेने उभा राहण्यास सज्ज झाला आहे. एकजूट होऊया,
महाराष्ट्र वाचवूया!
 विजय मराठी माणसाचाच!
जय महाराष्ट्र…!!