हिंदु तरुणीच्या वाढदिवसाला आलेल्या मुस्लीम तरुणांना बजरंग दल कार्यकर्त्यांची मारहाण

उत्तर प्रदेशमधील बरेली येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका कॅफेमध्ये घुसून मुस्लीम तरुणंना मारहाण केली आहे. या कॅफेमध्ये एका हिंदू तरुणीचा वाढदिवस साजरा होत होता. त्या वाढदिवसासाठी हे तरुण आले होते.

सदर तरुणी ही नर्सिंगची विद्यार्थीनी असून शनिवारी तिच्या वाढदिवसानिमित्त तिने एका कॅफेमध्ये पार्टी ठेवली होती. त्या पार्टीसाठी तिने तिच्या नऊ मित्र मैत्रीणींना बोलावले होते. त्यातील दोघे हे मुस्लीम समाजाचे होते. हे जेव्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजले ते कॅफेत आले व त्यांनी तिथे राडा केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्या दोघा तरुणांवर लव्ह जिहादचा आरोप केला. त्यांनी त्या तरुणांना मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी केली.