
नव्या वर्षात नौदलाच्या ताफ्यात दोन युद्धनौका सामील होणार आहेत. निलगिरी क्लासची ‘तारागिरी’ आणि शॅलो वॉटर क्राफ्ट ‘अंजदीप’ अशी त्यांची नावे आहेत. जानेवारी महिन्यातच या दोन्ही युद्धनौकांचे अनावरण होईल.
‘तारागिरी’ ही निलगिरी क्लासची चौथी युद्धनौका आहे. अशा एकूण सात युद्धनौका नौदलाला मिळतील. ‘अंजदीप’ हेदेखील शॅलो वॉटर क्राफ्ट आहे. नौदलाला असे एकूण 16 शॅलो वॉटर क्राफ्ट मिळतील.
‘तारागिरी युद्धनौका ही दीर्घ पल्ल्यावर मारा करणारी सपेन्स टू सपेन्स क्रूझ मिसाईल, ब्रह्मोस, स्वदेशी रॉकेट लाँचर, कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम, फायर पंट्रोल सिस्टम यासारख्या अत्याधुनिक आणि अत्यावश्यक यंत्रणेने सज्ज असेल. निलगिरी क्लासच्या स्टेल्थ फ्रिगेटला प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत बनवण्यात आले आहे आणि ही नौदलाची अत्याधुनिक अशी युद्धनौका आहे.
नौदलाला एकूण 16 शॅलो वॉटर क्राफ्ट मिळणार आहेत. त्यामधील तीन नौदलात सामील झाले आहेत. जानेवारीमध्ये अँटीसबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट अंजदीप नौदलात सहभागी झाले आहेत.
‘अंजदीप’ युद्धनौका सुमारे 77 मीटर लांब आहे.
‘निलगिरी’ क्लासची युद्धनौका शिवालिक क्लास फ्रिगेट्स ही आक्रमक क्षमता, स्टेल्थ तंत्र, ऑटोमेशन, जिवंत राहण्याची क्षमता, मॉडय़ुलर निर्माण तंत्राच्या सुधारणेसाठी आहे. 6670 टन वजनाची ‘निलगिरी’ क्लासची युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रास्त्रs, सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टमने सज्ज आहे. यामध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाईल, सर्विलान्स रडार, हवेत मारा करणारी मिसाईल सिस्टम आणि अत्याधुनिक अँटी सबमरीन क्षमता आहे. याचे नवीन डिझाईन रडार, इंफ्रारेड, ध्वनी आणि मॅग्नेटीक सिग्नेचर्सला कमी करते. त्यामुळे हे अधिक स्टेल्थ होतात आणि त्यांना पकडणे कठीण होते.


























































