अमेरिका हेच आता संयुक्त राष्ट्र

‘जगातील वेगवेगळ्या देशांतील संघर्ष थांबवण्यात संयुक्त राष्ट्र संघाचा फार उपयोग होत नसून हे काम अमेरिकाच करत आहे. त्यामुळे अमेरिका हेच आता खरे संयुक्त राष्ट्र झाले आहे,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला.

‘टथ सोशल’ या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करून ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडियामधील युद्ध थांबवल्याचा दावा केला. तसेच, दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी तात्पुरत्या युद्धविरामास मान्यता दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. आपल्या दुस्रया कार्यकाळाच्या पहिल्या आठ महिन्यात आठ युद्धे थांबवल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.