
1 वीज, पाणी, मोबाईल इत्यादींचे बिल भरणे तसेच ईएमआय किंवा एसआयपीसाठीदेखील ऑटो पेद्वारे आपोआप पैसे खात्यातून कापले जातात.
2 अनेकदा मात्र ही सेवा डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे यूपीआय अॅपमधील ऑटो पे सुविधा काळजीपूर्व बघून रद्द करायला हवी.
3 गुगल पेवर तुमच्या नावाचे प्रोफाईलवर क्लिक करा. तिथे खाली ऑटो पे हा पर्याय निवडा. तेथून लाईव्ह या पर्यायातून हवे ते ऑटो पेमेंट रद्द करा.
4 पह्न पे या अॅपमध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात प्रोफाईल आयकॉनवर जा. तिथून मॅनेज पेमेंटमधून हवा तो ऑटो पेमेंट रद्द करण्याचा पर्याय तिथे दिसेल.
5 तिथे तुम्हाला ऑटो पे हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. या ठिकाणी सर्व सेवांसाठी सक्रिय असलेल्या ऑटो पेची यादी दिसेल. आपल्याला नको असलेले ऑटो पे रद्द करा.
























































