Chandrapur News जिल्ह्यात एकाच दिवशी वाघांच्या हल्ल्यात दोन मजूर ठार

बांबू कटाईचे काम करताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी तासाभरात झालेल्या वाघाच्या हल्ल्यात दोन मजूर ठार झाल्याची घटना ताडोबा बफर क्षेत्रातील मामला व महादवाडी परिसरात घडल्या. प्रेमसिंग दुखी उदे व बुदशिंग श्यामलाल मडावी अशी मृतांची नावे असून ते बालाघाट येथील रहिवासी आहेत. ताडोबाच्या बफर क्षेत्रात बांबू कटाईचे काम सुरू असून यासाठी वनविभागाने बालाघाट येथून मजूर बोलावले आहे. बांबूकटाई करतानाच ही दुर्दैवी घटना घडली. गेल्या वर्षभरात मानव वन्यजीव संघर्षात 47 जणांचा मृत्यू झाला आहे.