एकनाथ शिंदेंचा सख्खा भाचा अजित पवार गटात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सख्खा भाचा आशीष माने यांनी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे.

मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत माने यांनी हा प्रवेश केला. आशीष माने यांना अजित पवार गटाकडून चांदिवली प्रभाग क्र. 159 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचेही समोर आले आहे. या प्रवेशामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष धुमसत असल्याचे स्पष्ट झाले असून या प्रवेशामुळे वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. माने यांच्यासह भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांनादेखील अजित पवार गटाने प्रभाग क्र. 156 मधून उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे समजते. त्यामुळे मुंबईत महायुतीत संघर्ष वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.