
सोलापूर पालिकेसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या 18 जणांच्या पहिल्या उमेदवारी यादीत नाव जाहीर करूनही संबंधित अधिकृत उमेदवाराने थेट ‘एमआयएम’मध्ये प्रवेश केला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय असलेल्या उमेदवाराने एमआयएममध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे.
काँग्रेसने नुकतील कोल्हापूरसाठी 48 तर सोलापूरसाठी 18 जागांसाठी उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये सोलापूरच्या यादीत नाव असलेले फिरदोस पटेल याने एमआयएममध्ये प्रवेश केला. इच्छुकांच्या मुलाखती घेताना अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे काँग्रेस सोडल्याचा दावाही पटेल याने केला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुक शाब्दी आणि निरीक्षक अन्वर सादात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. उमेदवारी मिळाल्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला.


























































