
एपीके फाईल पाठवून सायबर ठगाने वृद्धाची 7 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आर.ए.के. मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. ते एका खासगी कंपनीत सल्लागार म्हणून काम करतात. त्याचे एका सरकारी बँकेत खाते आहे. 17 डिसेंबरला ते घरी होते. मोबाईलवर ते बँकेचे अॅप उघडत होते. ते अॅप उघडत असताना अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांनी ऑनलाइनवर नंबर सर्च केला. त्या नंबरवर त्याने पह्न केला. फोन उचलणाऱयाने त्यांना तो बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवले. तो अॅप उघडण्यास मदत करेल असे सांगण्यात आले. त्याने मदतीचा बहाणा करून बँक खात्याची माहिती घेतली. तसेच बँकेचा कर्मचारी हा व्हिडीओ कॉलवर मदत करेन असे सांगण्यात आले. काही वेळाने त्यांना दोन कॉल आले. त्याने तक्रारदार यांना बँकेची एपीके फाईल पाठवली. ती फाईल उघडल्यावर एक अॅप उघडले.
ठगाने सांगितल्यानुसार त्याने ती माहिती अपलोड केली. ठगाने वेगवेगळी कारणे सांगून ते अॅप नंतर सुरू होईल असे सांगून फोन कट केला. त्याचदरम्यान त्यांच्या मित्राने त्यांना फोन केला. पह्न करून त्यांचा फोन दुसऱया व्यक्तीकडे जात असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. ठगाने त्यांच्या खात्यातून 7 लाख 62 हजार 500 रुपये काढल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.


























































