
शरद पवार हे एक असामान्य नेते आणि माझे मेंटॉर आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे बारामती हे शहर अमर्याद शक्यतांचे प्रतिक बनले आहे, अशा शब्दात अदानी समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी यांनी पवार यांचे काwतुक केले.
बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या एआय सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतम अदानी, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आले होते. खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. एआय सेंटरच्या उद्घाटनाचा क्षण आमच्यासाठी ऐतिहासिक आहे असे अदानी म्हणाले.
पवार कुटुंब एकत्र
अदानी यांच्या दौऱयाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र बघायला मिळाले. एवढेच नव्हे तर कार्यक्रमात अदानी यांचे भाषण सुरू असताना त्यांच्या मोकळ्या खुर्चीवर येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी काही काळ चर्चा केली या दोघांमध्ये नेमकी काय खलबते झाली याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही
शरद पवार म्हणाले, गौतम अदानी देशातील उद्योग क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव आहे. अनेक क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे. त्यांनी शून्यातून सुरुवात केली. गुजरातमध्ये पालमापूर हे गाव आहे. त्या ठिकाणी उद्योगाला मर्यादा आहेत, हे लक्षावर आल्यावर ते मुंबईला आले. मुंबईला आल्यावर त्यांच्या खिशात काही नव्हतं. जो कोणी कष्ट करतो त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही. त्याचा फायदा गौतम भाईंनी घेतला, असे काwतुक शरद पवार यांनी केले.आपण जर बघितलं तर देशातील 23 राज्यात अदानी ग्रुपचा व्यवसाय आहे. त्यांनी लाखो हाताना काम दिले आहे. आणखी लाखो मुलांना काम करण्याचा अधिकार मिळेल असे शरद पवार म्हणाले.





























































