
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सात उमेदवार घोषित
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सात उमेदवारांची यादी घोषित केली. यामध्ये वार्ड क्र. 43 अजित रावराणे, वार्ड क्र. 48 अॅड. गणेश शिंदे, वार्ड क्र. 51 आरती चव्हाण, वार्ड क्र. 78 रदवा देऊलकर, वार्ड क्र. 112 मंजू जायस्वाल, वार्ड क्र. 140 संजय कांबळे, वार्ड क्र. 170 रूही खानोलकर यांच्या नावाचा समावेश आहे.
मुंबई कॉँग्रेसची 87 उमेदवारांची यादी जाहीर
मुंबईत कॉँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन मुंबई महापालिका निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित आघाडीला 62 जागा सोडल्यानंतर उर्वरीत जागांसाठी 87 उमेदवारांची पहिली यादी मुंबई कॉँग्रेसने जाहीर केली. यामध्ये साधारण 40 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
निवडणूक कामात टाळाटाळ;सोलापुरात 35 कर्मचाऱयांना नोटिसा
महापालिका निवडणुकीच्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेले 35 अधिकारी व कर्मचारी अद्याप नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या कार्यालयाकडे रुजू न झाल्याचे निदर्शनास आले आहे.ही बाब निवडणूक प्रक्रियेच्या पादर्शक व सुरळीत अंमलबजावणीत अडथळा करणारी असल्याने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक कामकाजात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


























































