
राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहेत. या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ही मुदत संपताच भारतीय जनता पक्षाने आपले मनसुबे उघड केले असून मुंबईवर उत्तर भारतीय महापौर बसवण्याची तयारी सुरू केली आहे.
मुंबईवर उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असे भाजप नेते कृपाशंकर सिंह म्हणाले. ते मीरा-भाईंदर येथे बोलत होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कमळाबाईचा बुरखा फाटल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबईसह सर्वत्र आम्ही इतके उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की, महापौर उत्तर भारतीयच असेल… हे विधान आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपाशंकर सिंग यांचं… चरितार्थासाठी आलेल्या, उत्तर भारतीयांना मराठी माणसाने आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनीच आज मराठी माणसाच्या डोक्यावर थयथय… pic.twitter.com/uTngfF0Qny
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 31, 2025
पहिल्या यादीत 20 अमराठी उमेदवार
मुंबईचा महापौर मराठीच होणार असे सांगण्यापासून पळ काढणाऱ्या मुंबई भाजपचा खरा चेहरा उमेदवार यादीवरून समोर आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने 66 जणांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये पटेल, त्रिवेदी, गाला, शर्मा, कनोजिया, पुरोहित अशा आडनावाच्या दीड डझन अमराठी उमेदवारांचा भरणा असल्याचे दिसून येत आले.
असे आहे मतांचे गणित
– मुंबईची सुमारे 1.30 कोटींची लोकसंख्या पाहता 36,85,600 म्हणजेच 36 टक्के मराठी मतदार आहेत, तर गुजराती-राजस्थानी 14 टक्के, मुस्लिम 18 टक्के उत्तर भारतीय 17 टक्के मतदार आहेत.
– तर दक्षिण भारतीय 7 टक्के मतदार आहेत, तर ख्रिश्चन 3 टक्के आणि सिंधी-बंगाली, पारसी 2 टक्के मतदार आहेत. यामध्ये तब्बल 61 टक्के मतदार हे अमराठी आहेत. ही अमराठी मते मिळवण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे.



























































