
नववर्षाच्या सुरुवातीलाच पाकड्यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानला डिवचले आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांनी हिंदुस्थानला इशारा दिला आहे. बलुचिस्थानात हिंदुस्थानचे समर्थन करणारा गट पाकिस्तानात हिंसाचार परवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचे कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल. पाकिस्तान स्वतः अंतर्गत अशांतता आणि दहशतवादाच्या गंभीर समस्येने त्रस्त असल्याचे सांगत हिंदुस्थानचे नाव न घेता, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी कडक इशारा दिला आहे. पाकिस्तानी सेनेकडून जारी केलेल्या निवदेनानुसार, जनरल आसिम मुनीर यांनी रावळपिंड येथील जनरल हेडक्वार्टर्मध्ये बलुचिस्थानवर आयोजित 18 व्या राष्ट्रीय कार्यशाळेत बोलताना टीका केली. ते म्हणाले की, पाकिस्तान आपल्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लघंन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
पाकिस्तानच्या या वक्तव्यानंर पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी एक गंभीर आरोप केला आहे. ज्यामुळे पाकिस्तानचे खरे रुप समोर येते आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था, आयएसआय, ड्रोनद्वारे पंजाबमध्ये शस्त्रे आणि दारूगोळा पाठवत आहे.
























































