
कुलाबा येथील तीन वॉर्डांमध्ये आपल्या कुटुंबातील तीन उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप ओबीसी नेते व माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे. याच एक व्हिडीओही समोर आला आहे. यावरूनच आता सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे.
X वर एक व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या की, “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सत्तेची खूप मिजास आलेली दिसतेय. विधानसभा अध्यक्षांना, विधान सभेच्या बाहेर कुठलेच अधिकार नसतात. नार्वेकर, जरा भारतीय संविधानात आर्टिकल १७८ ते १८१ मधे राज्य विधानसभेच्या कार्यपद्धतीचे नियम आणि कामकाजाचे आचरण (Rules of Procedure and Conduct of Business of State Legislative Assembly) वाचा, अध्यक्षांना सभेच्या बाहेर कुठलेच अधिकार नसतात.”
त्या म्हणालाय की, “ज्या थाटात तुम्ही जॉइंट कमिशनर ना फोन लावयला सांगितला आणि ज्या थाटात तुम्ही त्यांच्याशी बोललात यात सत्तेची मिजास दिसत होती. Withdraw his security immediately. As Vidhan Sabha speaker, these are my instructions, असे तुम्ही म्हणालात. तर भारतीय संविधानात, असे कुठलेही अधिकार तुम्हाला नाहीत. सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे.”






























































