ट्रेंड – स्वकमाईतून पहिला विमान प्रवास

कर्नाटकातील कोप्पल जिह्यातील एका सरकारी शाळेचे मुख्याध्यापक बिरप्पा अंदागी यांनी 24 शाळकरी मुलांना खास गिफ्ट दिले. अंदागी यांनी पहिल्यांदाच स्वतःच्या खर्चाने मुलांना विमान प्रवासाचा अनुभव दिला. त्यांच्या या कामाचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भरभरून कौतुक होत आहे. मुख्याध्यापक अंदागी यांनी मुलांसाठी स्वकमाईचे 5 लाख रुपये खर्च केले.  त्यांनी कोप्पल ते बंगळुरू असा विमान प्रवास मुलांना घडवला.  तोरंगलमधील जिंदाल विमानतळावरून बंगळुरूला जाणाऱया या विमानात विद्यार्थी, शिक्षक, माध्यान्ह भोजनाचे स्वयंपाकी आणि शाळा विकास आणि देखरेख समितीचे सदस्य होते. या प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.