सरसेनापती धनाजीराव जाधव

छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या काळात मराठा साम्राज्याला टिकवून ठेवण्यात महत्त्वाचे योगदान असणाऱया सरदारांपैकी एक सरसेनापती धनाजीराव जाधव. त्यांचा जन्म 1650 च्या सुमारास झाला. त्यांचे वडील शंभूसिंह जाधव हे पावनखिंडीच्या लढाईत धारातीर्थी पडले होते. धनाजीरावांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सैन्याचे शिक्षण मिळाले. उंबरणीच्या लढाईत व नेसरीच्या लढाईत त्यांनी मोठे शौर्य दाखवले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याने मराठा साम्राज्यावर हल्ला केला असताना, धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे या दोन्ही परामी सरदारांनी मराठय़ांच्या स्वातंत्र्यलढय़ाची धुरा सांभाळली. राजाराम महाराज जेव्हा जिंजीला गेले, तेव्हा धनाजींनी मोठा पराम गाजवला, म्हणून त्यांना `साहेबनौबत’ हे पद व `जयसिंगराव’ हा किताब दिला होता. 27 जून 1708 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची समाधी कोल्हापूर जिह्यामध्ये पेठ वडगाव येथे आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि सरसेनापती म्हणून त्यांचे कार्य अनमोल आहे.