पिंपरी-चिंचवडमध्ये 317 महिला रिंगणात

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत एकूण 691 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यामध्ये 317 महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे 128 जागांपैकी 64 जागा महिलांसाठी राखीव आहेत. वेगवेगळ्या पक्षांच्या एकूण 64 महिला सभागृहात प्रवेश करणार हे निश्चित आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिंदे गट, भाजप, काँग्रेस, मनसे, वंचित, बसपा, भाकप, रासप आदींनी महिलांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.