
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष व आमदार ज. मो. अभ्यंकर 36 विधानसभा क्षेत्रातील वॉर रूम्स, शिवसेना शाखांना भेटी देऊन उमेदवारांचा प्रचार करत आहेत. गृहभेटी करून प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या सोबत शिक्षक सेनेचे सर्व संघटक, शाखा समन्वयक, विविध प्रमुख पदाधिकारीसुद्धा प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
आमदार ज. मो. अभ्यंकर विधान परिषदेवर मुंबईतील सर्व विधानसभा क्षेत्रांचे शिक्षक आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात. कुलाबा ते मानखुर्द आणि मुलुंड तसेच चर्चगेट ते दहिसर या विभागात येणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डांमध्ये प्रचारासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने जबाबदारी घेतली आहे. पालिका निवडणुकीत शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी योग्य त्या प्रकारचे नियोजन करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.




























































