
देशातील पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विविध न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. बॉम्बच्या धमकीने मोठ्या प्रमाणात घबराट पसरली असून न्यायालय परिसर रिकामे करण्यात आले आहे. न्यायालयांमध्ये उपस्थित न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
छत्तीसगडमधील बिलासपूर आणि राजनांदगाव जिल्हा न्यायालयांना आणि मध्य प्रदेशातील रेवा जिल्हा न्यायालयाला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. आता त्या-त्या ठिकाणी बॉम्बशोधक पथके घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण परीसराची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयांना ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. हा मेल कोणी आणि कुठून पाठवला हे तपासण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली आहे. प्राथमिक तपासात ही अफवा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


























































