
शिंदे गटाने केलेल्या बेकायदा बांधकामाच्या तक्रारीवरून उमेदवारी रद्द केल्याने हायकोर्टात धाव घेणाऱ्या भाजप उमेदवाराला हायकोर्टाकडून आज दिलासा मिळाला. भाजप उमेदवाराची उमेदवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने वैध ठरवत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हायकोर्टाने रद्द केला, त्याचबरोबर वाशीतील प्रभाग 17 अ मधील निवडणुकीला दिलेली स्थगिती उठवत नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. वाशीच्या 17 अ या प्रभागातून भाजपचे उमेदवार नीलेश भोजने यांनी अर्ज भरला होता. मात्र शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी त्यांच्या विरोधात बेकायदा बांधकामासंदर्भात तक्रार केल्याने निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद केला होता.





























































