
महापालिका निवडणुकीसाठी लहूशक्ती व शिवशक्ती महासंघाने शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
देशात सध्या दडपशाही सुरू आहे. लोकशाही देश हुकूमशाहीच्या दिशेने पावले टाकत आहे. राज्यातील परिस्थिती बिघडली असून राज्यात महागाई आणि बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. ही महागाई कमी करण्यात सरकारला सपशेल अपयश आले आहे. शहरातील सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांमुळे असंतोष वाढला आहे. सत्ताधारी पक्ष आश्वासनांच्या नावाखाली जनतेची फसवणूक करत आहे. शहरातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत ठाम भूमिका घेणाऱ्या आणि मराठी माणसाच्या भल्याचा विचार करण्यासाठी मुंबईचा महापौर मराठी करण्यासाठी शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा देत आहे. लोकशाही आणि मराठी माणसांची मुंबई वाचविण्यासाठी लहूशक्ती व शिवशक्ती महासंघ शिवसेनेसोबत आधीही होता व यापुढेही राहील, अशी ग्वाहीही संतोष पवार यांनी दिली.


























































