
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात सत्ताधाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर पैसे वाटल्याचे आरोप होत असतानाच कोल्हापुरात भयंकर प्रकरण समोर आले आहे. शिंदे गटाच्या आमदाराने एका तरुण कंत्राटदाराकडून 40 लाख रुपये उकळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी हा व्हिडीओ शेअर करत सरकारकडे खुलाशाची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील हा व्हिडीओ टॅग केला आहे. ‘आमदारांवर एखादा आरोप होत असेल तर त्याची सत्यता आणि पडताळणी होणे आवश्यक आहे,’ असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. हा ‘एआय’चा वापर करून बनवलेला व्हिडीओ दिसत नाही. त्यामुळे त्या माणसाला बोलावून त्या व्यक्तीकडून पोलिसांनी या सगळ्याची खातरजमा करून घ्यायला हवी, असे सतेज पाटील म्हणाले.
























































