
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. निवडणुकीच्या राजकारणात कोणाची आघाडी झाली, तर कोणाची युती. कोणाच्या आघाडीत बिघाडी झाली, तर कुठे बंडखोरांनी बंडाचे निशाण फडकाविले. या सगळय़ा राजकीय घडामोडींमध्ये उद्याचा दिवस मतदार राजाचा आहे. ऐनवेळेवर मतदारांना आपले मतदान केंद्र नेमके कुठे आहे याची माहिती मिळत नाही. त्यामुळे कंटाळून मतदार मतदान न करताच घरी बसतात. म्हणून तुमचे नाव मतदार यादीत आहे का, कोणत्या भाग क्रमांकात आहे आणि मतदान केंद्र कोणते, याची माहिती आताच घेऊन ठेवा.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या mahasecvoterlist.in वर जाऊन तुमचे नाव, EPIC नंबर टाकून तुमचे नाव तपासू शकता. याशिवाय तुम्ही राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलची (NSVP) साईट voters.eci.gov.in वर जाऊन तुम्ही मतदार यादीत तुमचे नाव शोधू शकता. हा पर्याय निवडल्यावर तुमचे नाव झ्घ्णिं् क्रमांकाआधारे पाहता येईल.
मतदार हेल्पलाईन अॅप करा डाऊनलोड
निवडणूक आयोगाचे मतदार हेल्पलाईन अॅप आहे. हे अॅप तुम्ही eci.gov.in वरून डाऊनलोड करून घ्या. या अॅपवर तुम्ही तुमचे नाव सहज पाहू शकता. तुमचे नाव मतदार यादीत नोंदवल्यावर मतदान करतेवेळी आधार कार्ड, पॅन कार्ड वा पासपोर्टसारखे कागदपत्रे अथवा ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.
























































