
मतदानानंतर बोटावरील शाई पुसण्यासाठी लोक उभे केले जात आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आज मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यातच त्यांनी X वर पोस्ट करत हा आरोप केला आहे.
X वर पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रिया आज पार पडत असताना माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या अतिशय धक्कादायक व चिंताजनक आहेत. अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएमबाबत गंभीर घोळ समोर येत आहेत. अनेक ठिकाणी मतदान केल्यानंतर कोणाला मत गेले याचा लाईट लागत नाही, सर्व मते दिल्यानंतर ‘बीप’ आवाज येत नाही. अनेक ठिकाणी तर मतदानानंतर बोटावरील शाई पुसण्यासाठी लोक उभे केले जात आहेत. हे बोगस मतदानासाठी तर नाही ना, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.”
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मतदान केंद्रे व अनुक्रमांक यामध्ये अद्यापही घोळ आहेत. काही ईव्हीएमवर उमेदवारांची नावे चुकल्याचे आढळून आले आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर उघडपणे पैशांचे वाटप होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. या सर्व गंभीर प्रकारांमुळे मतदारांमध्ये गोंधळ व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून ही संपूर्ण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सशक्त लोकशाहीसाठी मतदान प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह असणे आवश्यक आहे, मात्र सध्या तसे होताना दिसत नाही, हे खेदाने नमूद करावे लागते.”
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रिया आज पार पडत असताना माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या अतिशय धक्कादायक व चिंताजनक आहेत. अनेक मतदान केंद्रांवर EVM बाबत गंभीर घोळ समोर येत आहेत. अनेक ठिकाणी मतदान केल्यानंतर कोणाला मत गेले याचा लाईट लागत नाही, सर्व मते दिल्यानंतर ‘बीप’ आवाज… pic.twitter.com/wQayw3AbiS
— Supriya Sule (@supriya_sule) January 15, 2026































































