
मुंबई महापालिका निवडणुकीत जोगेश्वरीमध्ये शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बालेकिल्ला अभेद्य राखला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-मनसे युतीच्या वॉर्ड क्रमांक 77 मधील उमेदवार शिवानी शैलेश परब यांचा दणदणीत विजय झाला आहे. शिवानी परब यांनी मिंधे गटाच्या प्रियांका आंबोळकर यांचा दारुण पराभव केला. शिवानी परब यांचा 15 हजार 421 मते मिळवून विजय झाला. शिवानी परब यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.





























































