BMC Election 2026 – मुंबईत वॉर्ड क्रमांक २०५ मधून शिवशक्तीच्या सुप्रिया दळवी विजयी

मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालात प्रभाग क्रमांक २०५ (नायर हॉस्पिटल – भायखळा फायर ब्रिगेड, F/South विभाग) मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या शिवशक्ती युतीच्या उमेदवार सुप्रिया दिलीप दळवी यांनी विजय मिळवला आहे.

हा प्रभाग परळ, भायखळा, कळाचौकी, अभ्युदयनगर, जिजामाता नगर, दाभोळकर अड्डा आदी भागांचा समावेश असलेला महत्त्वाचा भाग आहे. या वॉर्डात महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुप्रिया दळवी यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वर्षा गणेश शिंदे, काँग्रेसच्या अपूर्वा प्रवीण सालिस्तेकर आणि इतर उमेदवारांना मागे पराभूत करत विजय मिळवला आहे.

विजयानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया दळवी म्हणाल्या की, “हा मनसैनिक, शिवसैनिकांचा विजय आहे. पैसा हरला, निष्ठा आणि मराठी माणूस जिंकला. हा विजय निष्ठावंत व मराठी जनतेचा आहे. मराठी माणूस हलला नाही, डगमगला नाही, विकला गेला नाही.”