शिवसेनेचा डबल धमाका, सरवणकर यांच्या मुलापाठोपाठ मुलीचाही पराभव; विशाखा राऊत विजयी

मिंधे गटाचे सदा सरवणकर यांचे संपूर्ण प्रस्थ शिवसेनेने उद्ध्वस्त केले आहे. सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्या पराभवानंतर आता त्यांची मुलगी प्रिया गुरव-सरवणकर हिचाही पराभव झाला आहे. वॉर्ड क्रमांक 191 मधून शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी प्रिया सरवणकर यांचा पराभव केला आहे.