
मुंबईत मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार विजयी झाले आहेत. ते मुंबईच्या वार्ड 192 मधून निवडणूक लढवत होते. ते शिवसेना भवनाच्या प्रभागातून निवडणूक लढवत होते, त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानण्यात येत होती. या विजयाचे श्रेय त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. तसेच शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मोहनतीमुळेच हा विजय मिळाल्याचे ते म्हणाले आहेत.
जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला आहे आणि प्रेम केले आहे, त्यांचे आपण आभार मानतो, अशी प्रतिक्रिया किल्लेदार यांनी व्यक्त केली आहे. आपण आपल्या राजकारणामुळे कुटुंबियांना वेळ देऊ शकलो नाही, त्यांनी आपल्याला समजून घेतले, त्यासाठी कुटुंबियांबाबतही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा विजय म्हणजे आपली 20-25 वर्षांची तपश्चर्या आहे. त्यामुळे विजयाची खात्री होती. तसेच काल मतदान यंत्रातील अडचणीमुळे आपले मताधिक्य कमी झाले आहे. हा गोंधळ झाला नसता तर आपले मताधिक्य वाढले असते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.





























































