
वांद्रे पूर्वेत वॉर्ड क्र. 87 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार पूजा महाडेश्वर यांचा विजय झाला. भाजपच्या महेश पारकर यांचा पराभव करत पूजा महाडेश्वर यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. पूजा महाडेश्वर या माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी आहेत. पूजा महाडेश्वर आणि महेश पारकर यांच्यातील लढत चुरशीची मानली जात होती. मात्र दोन वेळा नगरसेवक राहिलेल्या महेश पारकर यांना चारी मुंड्या चीत करत पूजा महाडेश्वर यांनी विजयाचा गुलाल उधळला.






























































