प्रजासत्ताक दिनासाठी रंगीत तालीम!

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे शौर्य, शिस्त आणि सामर्थ्याचे दर्शन घडवणारा लष्कराचा सराव सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. दिल्लीतील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम शनिवारी मोठय़ा दिमाखात पार पडली. पुढील आठवडय़ात मंगळवारी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी सर्व तयारी पूर्ण केली जात आहे. लष्कराने दिल्लीतील इंडिया गेटवर परेडचा कसून सराव केला. यावेळी कर्तव्य पथावर हिंदुस्थानी लष्कराच्या सामर्थ्याची झलक पाहायला मिळाली. लष्करातील जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करून आपली लष्करी ताकद संपूर्ण जगाला दाखवली आहे. यंदाचे पथ संचलन वंदे मातरमच्या थिमवर असणार आहे.