
टाटा मोटर्सने आपली प्रसिद्ध मायक्रो एसयूव्ही टाटा पंचचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत केवळ 5.59 लाख रुपये आहे. या कारची थेट टक्कर ह्युंदाई एक्स्टर, निसान मॅग्नेट आणि रेनॉ कायगर या कारशी होईल. या कारमध्ये 90 हून अधिक ऑक्टिव आणि पॅसिव सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. या कारला एकूण सहा व्हेरियंटमध्ये आणले असून शेवटच्या व्हेरियंटची किंमत 8.99 लाख रुपये आहे. टाटा पंचला एकूण चार रंगाच्या ऑप्शनमध्ये आणले असून यामध्ये सँटाफिक, पॅरामल, बेंगाल रफ आणि पूर्ग क्लाऊडचा समावेश आहे. या कारमध्ये 45 हून अधिक कनेक्टेड फिचर्स देण्यात आले आहेत.






























































