
एनसीआरसह जवळपासच्या परिसरात वायुप्रदूषण प्रचंड वाढल्याने दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) वाढला आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीत ग्रेप-3 लागू करण्यात आला असून याअंतर्गत बोअरिंग आणि ड्रिलिंगसह उत्खनन काम थांबवण्यात आले आहे. तसेच रस्ते बांधकामावर बंदी घालण्यात आली असून गटार आणि पाण्याच्या पाइपलाइन, ड्रेनेज आणि इलेक्ट्रिक केबल्स टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. विटा आणि दगडी बांधकामावरसुद्धा बंदी घालण्यात आली आहे. सिमेंट प्लॅस्टिक, कोटिंग इत्यादी कामे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बांधकाम साहित्य वाहून नेणाऱया वाहनांना कच्च्या रस्त्यावरून चालविण्यास मनाई आहे. तोडफोडीचा कचरा वाहून नेण्यास परवानगी दिली जाणार नाही.






























































