सुनील गावसकर यांचे विराट कोहलीच्या भविष्याबद्दल भाकीत, म्हणाले…

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये विराट कोहलीच्या नावाची नोंद केली जाते. सध्या फक्त वनडेमध्ये विराट कोहली नावाच वादळ गोंगावताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत विराटने विस्फोटक अंदाजात एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं. विराट कोहलीची धुवाँधार फटकेबाजी सुरू असतनाचा टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या भविष्याबद्दल भाकीत केले आहे.

विश्वचषक खेळायचाच होता; पण बाहेर बसावं लागलं! संघाबाहेर ठेवल्याने सिराजची खंत

Jio Hotstar शी बोलताना सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या फलंदाजी आणि फिटनेसचे कौतुक केले आहे. चपळ चित्याप्रमाणे खेळपट्टीवर चोरून धाव घेण्यात विराट कोहली आजही वरचढ आहे. वयाच्या 37 व्या वर्षीही त्याची चपळाई संघासाठी फायद्याची ठरते. त्यामुळे सुनील गावसकर यांचा असा अंदाज आहे की, विराट कोहली 2027 चा वनडे वर्ल्ड कपच नाही तर 2031 चा वनडे वर्ल्ड कप खेळण्यासाठीही आपली दावेदारी सिद्ध करत आहे. सामना जिंकवण्याचा सतत प्रयत्न करणे, संघ पिछाडीवर असताना संघाला पुन्हा स्पर्धेत आणणे, सहकारी खेळाडूंमध्ये जोश भरणे यासारख्या अनेक गोष्टी विराट कोहली मैदानामध्ये करत असतो. तो सध्या ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यात आवडण्यासारखे बरेच काही आहे, असं सुनील गावसकर म्हणाले आहेत.