
बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्याने राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आता राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक शाळा सरकारच्या नियंत्रणाखाली आणल्या जाणार आहेत. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज नागपूरमध्ये ही घोषणा केली.
बदलापूरसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभाग, गृह व परिवहन विभागाची संयुक्त बैठक घेऊन ठोस उपाययोजना करणार असल्याचेही ते म्हणाले. या शाळा सरकारच्या अखत्यारीत आणण्याबाबत आतापर्यंत कोणतीही तरतूद नव्हती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
g नव्या कायद्यानुसार शाळेची नियमावली कशी असावी, कोणत्या सुविधा असाव्यात, मनुष्यबळ किती असावे, सुरक्षेसाठी कशी काळजी घ्यावी याबाबत तरतुदी करण्यात येतील. विधिमंडळाच्या मंजुरीनंतर या कायद्याची अंमलबजावणी होईल.























































