
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त टाटा स्मारक रुग्णालय स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने कर्करुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 540 जणांनी यशस्वीपणे रक्तदान केले.
शिवसेनेचे नगरसेवक किरण तावडे, सचिन पडवळ, श्रद्धा जाधव, श्रद्धा पेडणेकर, उर्मिला पांचाळ, उपविभागप्रमुख पराग चव्हाण, शाखाप्रमुख मीनार नाटाळकर, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे कार्यालय प्रमुख सुधाकर नर, चिटणीस उल्हास बिलये, बाळासाहेब कांबळे, टाटा रुग्णालयाचे प्रशासकीय संचालक अनिल साठे, प्रशासकीय अधिकारी विजेंद्र तिवारी आदींनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.
या शिबिराच्या आयोजनात भारतीय कामगार सेना व स्थानीय लोकाधिकार समिती या दोन्ही युनिटचे अध्यक्ष तुकाराम गवळी, स्थानीय लोकाधिकार समितीचे युनिट सरचिटणीस नंदकिशोर कासकर, कार्याध्यक्ष ललित फोंडेकर, उपाध्यक्ष जगदीश सोळंकी, खजिनदार नितीन गवळी, संतोष शिंदे, नितीन सातपुते, सतीश पुजारी, नीलेश गायकवाड, संदीप धामणकर, समीर चव्हाण, विजय कुलट, गणेश कांबळे, मिलिंद नाईक, रणजीत अरिहंते, सुरेश आरोंदेकर, प्रताप कोळी, पुष्पा इब्रामपुरकर, विजया माने, अनिता गजरे, कलावती मकवाना आदींनी हातभार लावला.
























































