
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’च्या दुरुस्तीचे काम मंगळवारपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे 27 जानेवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंत बारा दिवस मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ठाणे व भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागांना पालिकेकडून ज्या भागांना पाणीपुरवठा होतो त्या भागांमध्येदेखील ही 10 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. या पाणीकपातीमध्ये शहर विभागात ‘ए’ विभाग – नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र, ‘बी’ विभाग – संपूर्ण विभाग, ‘सी’ विभाग – भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला क्षेत्र, ‘ई’ विभाग – पूर्ण विभाग, ‘एफ दक्षिण’ विभाग – संपूर्ण विभाग, ‘एफ उत्तर’ विभाग – संपूर्ण विभागात पाणीकपात होईल, तर पूर्व उपनगरामध्ये ‘टी’ विभाग – मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) क्षेत्र, ‘एस’ विभाग – भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) क्षेत्र, ‘एन’ विभाग – विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर, ‘एल’ विभाग – कुर्ला (पूर्व) क्षेत्र, ‘एम पूर्व’ विभाग – संपूर्ण विभाग, ‘एम पश्चिम’ विभाग – संपूर्ण विभागात 10 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.



























































