
लाल रक्तपेशींचे निर्माण, स्नायूंचे काम नीट ठेवणे आदींमध्ये व्हिटॅमीन बी-12ची भूमिका फार महत्त्वाची असते. ते कमी असेल तर अशक्तपणा, मज्जासंस्थेचे आजार, हातपाय सुन्न पडणे आदी त्रास उद्भवतात.
नैसर्गिकरीत्या व्हिटॅमीन बी-12 वाढवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करायला हवा. त्यात दही हा एक महत्त्वाचा घटक आहे. दह्यामुळे शरीरात चांगल्या जिवाणूंची संख्या वाढते. ते बी-12 निर्माण करण्यास मदत करतात.
इडली, डोसा यासारखे पदार्थदेखील व्हिटॅमीन बी-12 वाढविण्यास मदत करतात. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांचा काही प्रमाणात समावेश असावा, बीट आणि गाजर यांचे नियमित सेवन खूप फायदेशीर ठरते.

























































