
युनिक लॉगिन आणि पासवर्ड लीकचे एक नवीन प्रकरण उघड झाले आहे. ताज्या अहवालांनुसार 14 कोटी 90 लाख अकाउंट्सचे पासवर्ड आणि लॉगिन तपशील लीक झाले आहेत. यामध्ये जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम, नेटफ्लिक्स आणि डिस्ने प्लस सारखी नावे समाविष्ट आहेत. तुम्ही जीमेल, फेसबुक, नेटफ्लिक्स किंवा इंस्टाग्राम वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अलीकडेच 14 कोटी 90 लाख युनिक आयडी लॉगिन आणि पासवर्ड लीक झाल्याची घटना घडल्याचे वृत्त आहे. WIRED ने दिलेल्या वृत्तानुसार, हा डेटा कोणत्याही सुरक्षा किंवा पासवर्डशिवाय उपलब्ध होता.
प्रसिद्ध सुरक्षा विश्लेषक जेरेमिया फाउलर यांनी हा डेटाबेस शोधला. फाउलरच्या मते, हे लीक झालेले रेकॉर्ड जवळजवळ प्रत्येक मोठ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी जोडलेले आहेत. लीक झालेल्या पासवर्ड प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि काही डेटिंग अॅप्सचा समावेश आहे. लीकमध्ये नेटफ्लिक्स, एचबीओ मॅक्स, डिस्ने प्लस आणि रोब्लॉक्ससह स्ट्रीमिंग अॅप्स आणि मनोरंजन अॅप्सचा देखील समावेश आहे.
फाउलरच्या मते, अंदाजे ४८ दशलक्ष जीमेल अकाउंट्स, ४ दशलक्ष याहू अकाउंट्स आणि १.५ दशलक्ष आउटलुक अकाउंट्समधील डेटा लीक झाला आहे. सोशल मीडियाच्या १७ दशलक्ष फेसबुक अकाउंट्स, ६.५ दशलक्ष इंस्टाग्राम अकाउंट्स आणि ७८०,००० टिकटॉक अकाउंट्सची माहिती लीक झाली आहे. मनोरंजन विभागात, डिस्ने प्लससह अंदाजे ३.४ दशलक्ष नेटफ्लिक्स अकाउंट्सचे लॉगिन आणि पासवर्ड लीक झाले आहेत. आर्थिक आणि सरकारी अकाउंट्सच्या यादीत ४२०,००० लॉगिन तपशील आणि पासवर्ड समाविष्ट आहेत.
फाउलरने सांगितले की हा डेटाबेस इन्फोस्टेलर नावाच्या मालवेअरने तयार केला आहे. जो डिव्हाइसेसना नुकसान पोहोचवण्यासाठी आणि लॉगिन आणि तपशील चोरण्यासाठी डिझाइन केलेला एक प्रकारचा धोकादायक सॉफ्टवेअर आहे. फाउलर यांनी म्हटले आहे की, जेव्हा डेटा गोळा केला जातो किंवा चोरीला जातो तेव्हा तो कुठेतरी साठवला पाहिजे. क्लाउडमध्ये डेटा साठवणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. या निष्कर्षावरून असे सूचित होते की सायबर हॅकर्स देखील डेटा चोरतात.
डेटा किंवा पासवर्ड लीकपासून संरक्षणासाठी काही गोष्टी पाळाव्या. वेगवेगळे पासवर्ड ठेवा, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. पासवर्ड तयार करताना किमान १२-१६ अक्षरे, अंक, चिन्ह वापरा. जवळजवळ सर्व प्लॅटफॉर्म टू-स्टेप व्हेरिफिकेशन देतात. टू-स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये, ओटीपी मोबाईल नंबरवर किंवा जीमेलवर येतो.त्यामुळे पासव्रड सुरक्षित ठेवणे सोपे जाते.
























































