Ajit Pawar Death – अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू

अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, फॉरेन्सिक टीम त्याचा तपास करत आहे. यामुळे अपघाताचे नेमके कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

ब्लॅक बाॅक्स सापडल्यानंतर, फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) इंजिनची कार्यक्षमता, नियंत्रण पृष्ठभागाची स्थिती आणि सिस्टम इशाऱ्यांबद्दल अचूक डेटा हातात येईल. तसेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आपत्कालीन चेकलिस्ट, क्रू समन्वय किंवा यांत्रिक समस्यांवरील चर्चा ब्लॅक बाॅक्स सापडल्यानंतर समोर येणार आहे.

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

“ब्लॅक बॉक्स” हा चमकदार नारिंगी रंगाचा असतो. मुख्यतः आगीपासून बचाव व्हावा याकरता ब्लॅक क्रॅश-प्रतिरोधक उपकरण आहे. ब्लॅक बाॅक्स हा आगीपासून बचाव होईल असाच तयार केलेला असतो. प्रत्येक व्यावसायिक विमानात असे दोन रेकॉर्डर असतात. जे मजबूत आवरणांमध्ये ठेवलेले असतात जे स्फोट, आग, पाण्याचा दाब आणि उच्च-वेगाने होणाऱ्या अपघातांना तोंड देऊ शकतात.

ब्लॅक बाॅक्स फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) उंची, वेग, इंजिन थ्रस्ट आणि फ्लाइट मार्ग डेटा यासारखे महत्त्वाचे तांत्रिक पॅरामीटर्स रेकॉर्ड करतो. तसेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) सर्व कॉकपिट ऑडिओ रेकॉर्ड करतो – पायलट संभाषणे, रेडिओ ट्रान्समिशन, चेतावणी अलार्म आणि यांत्रिक आवाज या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती ब्लॅक बाॅक्सच्या माध्यमातून मिळते. यामुळे अपघाताचे नेमके कारण समोर येण्यास मदत होणार आहे.