
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणने त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर तातडीने अणुकरार करावा, अन्यथा अमेरिकेचा पुढचा हल्ला आणखी विनाशकारी असेल. ट्रम्प यांनी बुधवारी ट्रुथ सोशलवर लिहिले की, इराणने असा करार करावा ज्यामध्ये अण्वस्त्रांचा विकास थांबविण्याची स्पष्टपणे तरतूद असेल. ट्रम्प म्हणाले की, वेळ संपत चालली आहे आणि परिस्थिती भयानक आहे.
ट्रम्प यांनी जून २०२५ मध्ये अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणच्या प्रमुख परमाणु सुविधांवर हल्ला केला होता, याची आठवणही आपल्या पोस्टमध्ये करून दिली. ते म्हणाले आहेत की, जर इराणने त्याचे पालन केले नाही तर पुढचा हल्ला अधिक गंभीर असेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यांनी असेही म्हटले की, अमेरिकेचा एक मोठा नौदल ताफा इराणच्या दिशेने येत आहे.
जर इराणी सरकारने निदर्शकांविरुद्ध हिंसाचार केला तर, अमेरिका हस्तक्षेप करू शकते, असे ट्रम्प यांनी आधी म्हटलं आहे. तसेच इराणने आपला अणुकार्यक्रम पुन्हा सुरू केल्यास अमेरिका कारवाई करेल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.



























































