
महाराष्ट्र कॅरम संघटना आयोजित तिसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत पहिला दिवस डॉ. अनिल तायशेटेच्या खेळाने गाजवला. त्याने पहिल्या सेटमध्ये आंतरराष्ट्रीय पॅरमपटू व राष्ट्रीय विजेत्या कर्नाटकच्या झहीर पाशाला पहिला सेट 17-11 असे हरवून खळबळ माजवली. परंतु आक्रमक खेळाच्या जोरावर झहिरने दुसरा व तिसरा सेट 25-0, 25-5 असा सहज हरवून आपले आव्हान कायम ठेवले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे कोणताही गाजावाजा न करता अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. आज आघाडीच्या सर्वच खेळाडूंनी विजयी सलामी दिली.
पहिल्या फेरीचे इतर निकाल–
ओमकार टिळक (महाराष्ट्र )- रघुनाथ वाघपंजे (महाराष्ट्र) 13-27, 17-13, 15-5; आर. अरोक्यराज (तामीळनाडू)- इरफान खान (महाराष्ट्र) 18-10, 19-6; रिंकी कुमारी (महाराष्ट्र)- जगन्नाथ मैत्रानी ( महाराष्ट्र ) 25-0, 22-0; प्राजक्ता नारायणकर (महाराष्ट्र)- सूर्यकांत मोरे (महाराष्ट्र)20-4, 23-10; रीतिकेश वाल्मीकी (महाराष्ट्र)-अजगर शेख (महाराष्ट्र) 4-22, 16-14, 17-15; खातीम खलील(महाराष्ट्र)-रियाझुद्दीन शेख ( महाराष्ट्र ) 25-1-25-0; के श्रीनिवास (महाराष्ट्र)-जितेंद्र राठोड (महाराष्ट्र) 20-5, 25-5.























































